पाचोऱ्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ

पाचोऱ्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ

 

पाचोरा – दि. २१ जून २०२५

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या नव्या उंची गाठणाऱ्या यशस्वी वाटचालीला यंदा अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने देशभरात “संकल्प से सिद्धी” या प्रेरणादायी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा शहर मंडळ शाखेच्या वतीने आज दि. २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, शहरात सदस्य नोंदणी अभियानाचे भव्य आयोजन करण्यात आले. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भाऊसो. दिलीप वाघ होते. त्यांच्या हस्ते सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. कार्यक्रमास पाचोरा शहर व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पाचोरा शहराच्या सभासद नोंदणीच्या इतीहासात ऐतिहासिक गर्दी प्रथमच दिसुन आली

या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना “८८ ०००० २०२४” या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सदस्य होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात युवक, महिला, व्यापारी, शेतकरी, विविध समाजघटक भाजपाशी जोडले जात आहेत

या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विशेषतः नानासो. संजय वाघ, भाऊसो. मधुकर काटे, नानासो. व्ही. टी. जोशी, सुभाष पाटील, प्रदीप पाटील,डॉ. शांतीलाल तेली, रमेश वाणी , नंदू सोमवंशी, शिवदास पाटील, वासुदेव माळी, दादासो. सुदाम वाघ, हारूण देशमुख,सतीश चौधरी, अशोक मोरे,शरद पाटील, भूषण वाघ, निलेश पाटील, सुरज वाघ, बंटी महाजन ,अमोल ठाकूर,विनोद पाटील, भगवान मिस्तरी, प्रा.माणिक पाटील,बंडू नाना, अ‍ॅड. ललित सुतार, सुनील पाटील, हरीश पाटील, अनिल पाटील, वाजिद बागवान, ए. जे. महाजन, बंटी पाटील, गणेश पाटील, विशाल पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. महिला नेतृत्वाचा सशक्त प्रत्यय देणाऱ्या ताईसो. सुचेता वाघ, ताईसो. ज्योती वाघ, ताईसौ. प्रमिला वाघ, ताईसो. सरला पाटील, ताईसो. जयश्री मिस्त्री, ताईसो. सुरेखा पाटील, ताईसो. दीपमाला पाटील यांनी विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मार्गदर्शन करताना मा. दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले की, “देशाचे नेतृत्व करीत असलेले मा. नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताने संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ही प्रगती आणखी गती घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने भाजपच्या विचारधारेशी जोडले गेले पाहिजे. सदस्य नोंदणी हे केवळ औपचारिक कार्य नसून, देशहिताच्या दिशेने उचललेले एक सशक्त पाऊल आहे.”

“पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा परिवर्तनाचा वाहक असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि गरिबांच्या सक्षमीकरणाची धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.

सभासद नोदणी अभियानाला मिळणारा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहता सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गर्दी उसळली होती. अनेक युवक, महिला, व्यापारी, शेतकरी तसेच विविध घटकांतील नागरिकांनी भाजप सदस्यत्व घेण्यासाठी उत्साहाने पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी मोबाईलद्वारे “८८ ०००० २०२४” वर मिस्ड कॉल करून सदस्य नोंदणी करून दिली.या अभियानात डिजिटल सदस्य नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोबाईल अ‍ॅप, मिस्ड कॉल सुविधा, आणि ऑनलाइन पोर्टल्स यांचा वापर करून नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने केली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याने सदस्य नोंदणी प्रक्रियेची कार्यप्रणाली काळानुरूप अत्याधुनिक करण्यात आली आहे. या सदस्य नोंदणी अभियानामुळे पाचोरा शहरात राजकीय जागृतीसोबतच सामाजिक एकात्मतेचाही एक नवा अध्याय सुरु झाला आहे. विविध वयोगटांतील नागरिक, विविध समाजघटकांचे प्रतिनिधी या अभियानात सहभागी झाल्याने एकात्मता, बंधुता आणि विकासाच्या दिशेने समाज एकवटताना दिसून आला. या अभियानाच्या यशस्वी आयोजनानंतर पाचोरा शहर भाजप शाखेच्यावतीने पुढील काही दिवसांत प्रत्येक प्रभागात, वार्डात आणि गल्लोगल्लीत जाऊन सदस्य नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान दहा नवीन सदस्य जोडावेत, अशा उद्दिष्टासह काम सुरू करण्यात येणार आहे “भाजप सदस्य नोंदणी अभियान” हे केवळ संघटनात्मक बळकटीकरणाचे माध्यम नसून, देशाच्या सशक्त, आत्मनिर्भर आणि सुरक्षित भविष्यासाठी जनतेच्या सहभागाचे प्रतीक आहे. पाचोरा शहरात राबवले गेलेले हे अभियान हा उत्साह, संघटन आणि जनतेच्या विश्वासाचा भक्कम पुरावा ठरला आहे. यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर अध्यक्ष, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते यांचे विशेष योगदान राहिले.