अबॅकस स्पर्धेत पाचोऱ्याच्या श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लासचे घवघवीत यश

अबॅकस स्पर्धेत पाचोऱ्याच्या श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लासचे घवघवीत यश;१९ विद्यार्थी ठरले ट्रॉफी विनर

पाचोरा (वार्ताहर) दि,१९
प्रो ऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड कोल्हापूर आयोजित सहा मिनिटांत शंभर गणिते सोडविणे असे स्वरूप असलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल रिजनल कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) २०२२ -२३ या स्पर्धेमध्ये पाचोरा शहरातील श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासचे १९ विद्यार्थी नाशिक विभागातून विविध बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत.धुळे येथे शनिवारी झालेल्या या स्पर्धेत नाशिक विभागातील विविध ७५ अबॅकस केंद्रांमधील १०५० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेच्या गुगात विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळात गणितीय बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार करत आपली बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणीक जडणघडणीत मोलाची भर पडत असते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटानुरूप बक्षिसांची लयलूट केली असून यात
*रेनबो लेव्हल* -वेदांत प्रकाश चौधरी, दुसरा,आर्यन अनिल सिनकर, तिसरा,दिव्यांशु हरी चौधरी याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
*लेव्हल फर्स्ट न्यू* – सृष्टी प्रवीण ब्राह्मणे क्रमांक हिने पहिला क्रमांक मिळवला आहे.
तर *लेव्हल फर्स्ट* मधून -वेदांत अमोल पाटील याने दुसरा, ओवी वैभव दीक्षित तिसरा ,तेजोनिधी शिवाजी सावंत ,मनस्वी प्रदीप राठोड ,संयम कमलेश सुराणा, लक्ष ललित जैन या चारही विद्यार्थ्यांनी चौथा क्रमांक मिळवला आहे तर तनिष्का कपिल राऊल ,लीशा ललित जैन, धैर्य संतोष जोशी यांनी पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.
*लेव्हल टू* – कल्पेश चुडामन पुजारी याने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
*लेव्हल थ्री* राधिका धरमसिंग परदेशी हिने पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.तसेच क्लास मधील इतर विद्यार्थ्यांच्या बेस्ट परफॉर्मन्समुळे तसेच कमीत कमी वेळेत अधिक उदाहरणे बरोबर सोडवल्यामुळे त्यांना देखील आकर्षक मेडल्स देऊन गौरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी ,अजय मणियार,गिरीष करडे, सारिका करडे, तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे मास्टर ट्रेनर रविंद्र पाटील व सपना शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. हे दोघेही मास्टर ट्रेनर पाचोरा येथील बुरहानी इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक असून गेल्या 12 वर्षांपासून सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.