श्री. गो. से. हायस्कूल मध्ये गरजू, होतकरू, गरीब, कोरोना काळात आपला जीव गमावलेल्या पालकांच्या मुलांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो .से .हायस्कूल येथे आज गरजू , होतकरू, कोरोना काळात जीव गमावलेल्या पालकांच्या मुलांना विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या उपस्थितीत व संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही .टी .जोशी .यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी शाळेतील जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शालेय समिती चेअरमन खलील देशमुख ,ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी ,गजानन पेट्रोल पंपाचे संचालक प्रमोद सोनार शाळेचे मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर .पाटील, पर्यवेक्षक ए .बी अहिरे, अंजली गोहिल, प्रीतम सिंग पाटील, संगीता वाघ, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, तांत्रिक विभागाचे मनीष बाविस्कर रणजीत पाटील,तसेच पदाधिकारी उपस्थित होते. पाचोरा शहरातील विविध सामाजिक राजकीय दात्यांनी शाळेसाठी गरीब होतकरू मुलांना गणवेश देऊन मुलाचे पुण्याचे काम केल्याने त्यांचा संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले तर
अरुण कुमावत यांनी आभार व्यक्त केले .
























