नगरदेवळा स्टेशन ते बाळद रस्त्यावरील तितुर नदी फरशी पुलावर मोटारसायकल अपघातात गाडी पुलाखाली पडुन एकाचा मुत्यु
भडगाव प्रतिनिधी नगरदेवळा स्टेशन ते बाळद रस्त्यावरील तितुर नदीच्या फरशी पुलावरून मोटारसायकल अपघातात पुलाच्या खाली पडुन पाचोरा येथील शेख जावेद शेख उस्मान वय- ३७ या इसमाचा जागीच मुत्यु झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत शेख जावेद शेख उस्मान वय-३७ रा. बाहेरपुरा ता.पाचोरा यांच्या पत्नीची आजी मयत झाल्याने त्यांची मयत ठेवण्यासाठी पती पत्नी मोटारसायकल क्र. एम.एच. १७- ए.एच. या वाहनाने चाळीसगांव तालुक्यातील पिपंखेड येथे गेले होते व पत्नीस पिंपरखेड येथे सोडुन संध्या ७ वाजता पाचोरा कडे यायला निघाले असतांना नगरदेवळा स्टेशन ते नाचनखेडा रस्त्यालगत तितुर नदीच्या फरशी पुलावरून गाडी भरघाव वेगाने चालवित असतांना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलाच्या खाली पडल्याने यात जावेद शेख उस्मान शेख यांचा जागीच मुत्यु झाला याबाबत वडगांव खु.पोलिस पाटील संजय पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी वडगांव बु या हद्दीतील घटना असल्याने त्यांनी वडगांव बु. चे पोलिस पाटील विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भडगांव पोलिस स्टेशनशी संपर्क साधुन या घटनेची माहिती दिली यावेळी घटनास्थळी पोलीस निरिक्षक आशोक उतेकर यांनी भेट दिली व सदरघटनेचा पंचनामा पो.हे कॉ. कैलास गिते,पो.कॉ.दत्तात्रय पाटील यांनी केली याबाबत फिर्यादी विजय पाटील पो.पा. वडगांव बु यांच्या फिर्यादीवरून मयत आरोपी जावेद शेख हे त्यांच्या स्वताःच्या मुत्युस व नुकसानी कारणीभुत ठरल्याने त्याच्या विरोधात भडगांव पो.स्टे ३०४अ,२७९,३३७, ३३८,मोटर व्हिकल अॅक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पो.नि.अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि.आनंद पठारे हे करीत आहे.