पाचोरा कासार समाज बांधवां तर्फे तहसीलदार पाचोरा यांना निवेदन 

पाचोरा कासार समाज बांधवांतर्फे तहसीलदार पाचोरा यांना निवेदन

आज दिनांक १९ जुलै रोजी पाचोरा शहर व तालुक्यातील सोमवंशीय कासार समाजा तर्फे मा. तहसीलदार साहेब प्रवीण चव्हाणके यांना निवघा ता. मुदखेड, जि. नांदेड येथील आरोपी ज्ञानेश्वर पवार याला पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई कार्यवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाची अल्पवयीन मुलगी कुमारी सपना सतीश पेदे वय 17 वर्ष हिचा गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या याने मागील वर्षभरात अनेक वेळेस छेडछाड करून तिचा छळ करीत होता. त्या छळाला कंटाळून अखेर दिनांक 12 जुलै 2023 रोजी कुमारी सपना हिचा नाहक बळी घेतला, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीस पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील सर्व सोमवंशी क्षत्रिय कासार समाज यांनी केली.
आरोपी ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या या गाव गुंडावर पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सोमवंशी क्षत्रिय कासार समाज आंदोलन केल्यास होणाऱ्या परिणामास महाराष्ट्रातील कासार समाज जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदनाची प्रत पाचोरा – भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार- मा. किशोर आप्पा पाटील- यांना हि देण्यात आली.
या प्रसंगी अनिल कासार सर, अतुल शिरसमणे-सर, प्रशांत कासार,दिलीप कासार, विजय रामदासशेठ कासार , रामराव बाजीराव कासार, मनोज कासार, राजेश दामोदर कासार,योगेश कासार, गणेश कासार, प्रमोद कासार, , अविनाश कासार, प्रदीप कासार,किशोर कासार, अजिंक्य कासार, जितेंद्र कासार, परेश कासार, आणि समाज बांधव उपस्थित होते.