कुरंगी येथे बिबट्या आढळला – रूई वरती हल्ला तर‌ शेतकरी श्याम बाजीराव पाटील यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न – केला

कुरंगी येथे बिबट्या आढळला – रूई वरती हल्ला तर‌ शेतकरी श्याम बाजीराव पाटील यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न – केला श्यामदादांच्या मागे पाठलाग – पळ काढल्याने श्यामदादा यांना जीव वाचवण्यात यश

नुकताच हाती आलेल्या बातमीनुसार –

कुरंगी हद्दीतील सोनटेक शिवारात बिबट्या आढळला आहे.आणि रूई वरती हल्ला करून ठार केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र दादा धनगर यांच्या शेतापुढील श्याम बाजीराव पाटील यांच्या मक्याच्या शेतात आढळला आहे.

त्या बिबट्याने एका रूई च्या बच्चावरती हल्ला चढवुन ठार केले आहे.

अचानक शेतात गेल्याने श्यामदादा यांच्यावर सुध्दा हल्ला चढवत – पाठलाग केला आहे.

जोरात पळ काढण्यात यश आल्याने श्यामदादा यांचा जीव वाचला असुन – याबाबत सविस्तर माहिती वनविभागाला कळवण्यात आली आहे.

तरी परीसरातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांनी सतर्क राहावे.अशी विनंती वनविभागाने केली आहे.

लवकरच पथक दाखल होईल. 👍

काळजी घ्या – सुरक्षित राहा 🙏