श्री. गो .से. हायस्कूलचे पर्यवेक्षक आर एल पाटील यांचा संस्थेतर्फे सत्कार

श्री. गो .से. हायस्कूलचे पर्यवेक्षक आर एल पाटील यांचा संस्थेतर्फे सत्कार

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से .हायस्कूल येथे कार्यरत असलेले पर्यवेक्षक आर .एल .पाटील .यांचा पाचोरा तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी .जोशी. शालेय समिती चेअरमन खालील देशमुख, शालेय समिती चेअरमन तांत्रिक विभाग वासुदेव महाजन ,ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, शाळेचे मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन .आर .पाटील ,व पर्यवेक्षक ए .बी. अहिरे , अंजली गोहिल, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, तांत्रिक विभागाचे मनीष बाविस्कर, रणजीत पाटील सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी बोरसे यांनी केले तर अरुण कुमावत यांनी आभार व्यक्त केले