शिवभक्त कथेने पाचोरा परिसर जय शंभू या आवाजाने दुमदुमले

श्री महापुराण कथेच्या चौथ्या दिवशी परमपूज्य पंडित जी संजय जी शर्मा महाराज यांच्या शिवभक्त कथेने पाचोरा परिसर जय शंभू या आवाजाने दुमदुमला

(पाचोरा प्रतिनिधी )पाचोरा येथील श्री कैलास देवी मंदिर च्या बाजूला असलेल्या सावा मैदानावर होणाऱ्या श्री महापुराण कथा च्या चौथ्या दिवशी प्रचंड गर्दी महिला व पुरुषांचा पाचोरा शहरातून व तालुक्यातील उस्फुर्त गर्दी यावेळी श्री महापुराण कथा चे परमपूज्य पंडित जी श्री संजय जी शर्मा महाराजांनी कथाला प्रारंभ करून पाचोरा शहरवाशांचे मन जिंकली अगदी शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमास महिलांनी प्रचंड आनंद घेत महाराजांच्या भजन गीतावर नाचून आनंद व्यक्त केला यावेळी आयोजक पत्रकार मंडळी ग्रीन ॲपल व अग्रवाल समाजाचे तरुण कार्यकर्ते तसेच काही होतकरू कार्यकर्ते यांनी सहकार्य करून श्री महापुराण कथा यास अभिषेक साठी उस्फुर्त अशी गर्दी होत असून आरती साठी सुद्धा रोज काही मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे चौथ्या दिवशी गर्दी वाढत असून शहरातील नागरिक व महिला आनंद घेत आहे.