श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज व्यास पौर्णिमा” अर्थात “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज व्यास पौर्णिमा” अर्थात “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात

गुरु तुजविण नाही तुझा आधार पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज व्यास पौर्णिमा” अर्थात “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.सारिका पाटील मॅडम होत्या. प्रथमत: महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी समर्पक शब्दात आपली मनोगते व्यक्त केली. श्री.दीपक पाटील सर व मा. अध्यक्षांनी गुरूंविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राहुल वाघ सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती.रूपाली निकम मॅडम यांनी केले. प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.सीमा भदाणे मॅडम व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.