श्री.गो.से. हायस्कुल मध्ये आषाढी एकादशीची दिंडी व वृक्ष दिंडी उत्साहात संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कुल येथे दि. 7 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला पालखी दिंडी व वृक्ष दिंडी आयोजित करण्यात आली.
शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री.खलिल देशमुख यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील, पर्यवेक्षक सौ.ए.आर. गोहील, श्री.आर.बी.तडवी, श्री. आर. बी. बांठिया, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख श्री. एम. बी. बाविस्कर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री.एम. टी.कौंडिण्य, कार्यालय प्रमुख श्री.अजय सिनकर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी दिंडी व वृक्ष दिंडी विठू नामाच्या गजरात मार्गस्थ झाली. यावेळी मृदूंग, टाळ सोबत विद्यार्थ्यांनी ठेका व ताल घेत उत्कृष्ठ रिंगण प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गिरड रोड,भडगांव रोड, गजानन डेअरी मार्गे विद्यालयात विद्यार्थ्यांना फ़राळ देऊन दिंडीची सांगता झाली.
दिंडीच्या यशस्वीतेसाठी श्री. कांतायन सर, श्री. रवी जाधव सर, श्री. सागर थोरात, सौ एस. पी. सूर्यवंशी, श्रीमती स्मिता सोनवणे, सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.