शिरसाळा स्थित मारोतीरायाचे भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन

शिरसाळा स्थित मारोतीरायाचे भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन

जळगाव प्रतिनिधी। असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या शिरसाळा (ता. बोदवड) येथील जागृत मारूती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव असूनही शासनाच्या निर्बंधांमुळे कुलूप लावण्यात आले आहे. तथापि, अनेक भाविकांनी आज सकाळीच मंदिराच्या बाहेरूनच दर्शन करून आशीर्वाद घेतला.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा, ता.बोदवड येथील हनुमान मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हनुमान जयंतीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पण यंदा कोरोनामुळे मंदिर बंद आहे.
अशा परिस्थितीत आलेल्या भाविकांनी हनुमंताचे बाहेरूनच दर्शन घेऊन समाधान मानले. कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे आणि सर्वत्र शांती नांदू दे, असे साकडे भाविकांनी हनुमंताला घातले.