स्वराज्याच्या अमृत महोत्सव निमित्त मिठाबाई विद्यालयाची प्रभातफेरी

स्वराज्याच्या अमृत महोत्सव निमित्त
पाचोरा मिठाबाई विद्यालयाची प्रभातफेरी

पाचोरा (प्रतिनिधी)
येथील प्राथमिक विद्यामंदिर, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालय पाचोरा या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची धूम धडाक्यात सुरुवात झाली.

आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता परिसरात प्रभात फेरी काढून ” हर घर तिरंगा घर घर तिरंगा” चा आवाज बुलंद करण्यात आला. या निमित्ताने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थिनींनी पाचोरा शहरातील पांचाळेश्वर नगर, शिव कॉलनी, कृष्णापुरी, जामनेर रोड, आठवडे बाजार व चावडी मार्गे सवाद्य प्रभातफेरी काढली. प्रभात फेरीच्या अग्रभागी प्रेरणादायी देशभक्तीपर गीते गायिली जात होती. तर तर ध्वनिक्षेपकाचा च्या माध्यमातून नागरिकांना “घर घर तिरंगा हर घर तिरंगा” लावण्याचे आवाहन केले जात होते. प्रभात फेरी च्या मार्गात विद्यार्थी व शिक्षकांनी विविध देशभक्तीपर घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले ,लोकमान्य टिळक, शेतकरी, सैनिक अशा विविध वेशभूषा तसेच राष्ट्रीय एकात्मता दर्शक विविध धर्मांचे पोशाख परिधान केलेले मुले-मुली यांनी प्रभात फेरी ची शोभा वाढवली.

विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, उद्घोषक शिवाजी शिंदे, सर्व क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मिठाबाई कन्या विद्यालयात प्रभात फेरीची सांगता झाली. त्यावेळेस विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व अल्पोपहार वाटप करण्यात आला. सोमवारी सकाळी 10 वाजता मिठाबाई कन्या विद्यालयात “भारतीय स्वातंत्र्याची चळवळ व भारतीय सैन्य शक्ती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.