‘त्या’ सात संशयितांना अखेर जामीन

‘त्या’ सात संशयितांना अखेर जामीन

भडगाव येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याला मारहाण प्रकरणी अज्ञाताविरिद्ध दाखल गुन्ह्यात संशयित म्हणून अटक असलेल्या सातही जणांना अखेर जामीन मंजूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून आज ता.26 रोजी न्यायालयीन सोपस्कार झाल्यानंतर त्यांना कारागृहातून मुक्त केले जाईल अशी माहिती समोर आली आहे.
पेरणी कालावधीत शेतकऱ्यांकडील कृषी विजपंपांच्या बाकीची सक्तीने वीजबिल वसुली व मनमानी कारभाराच्या विरोधात काम करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कारभारा विरोधात पाचोरा व भडगाव तालूक्यातील महावितरणच्या कार्यालयांना आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने दि. 7 जून रोजी ताला ठोको आंदोलन केले होते. दरम्यान हे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर भडगाव येथील उपअभियंता कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. अभियंता धामोरे यांना मारहाणीच्या आरोपा नंतर महावितरणचे तंत्रज्ञ स्व.गजानन राणे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दवी मृत्यू झाला होता.दरम्यान या घटने नंतर भाजपाने मुख्य सुत्रधारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती तर शिवसेनेचे शहर प्रमुख किशोर बारावकर, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील यांनी अभियंता धामोरे हेच या घटनेचे मुख्य सूत्रधार असल्याचे पत्रक काढत त्यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.