कॉग्रेस आपल्या दारी पाचोरा कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी

कॉग्रेस आपल्या दारी पाचोरा कॉंग्रेस चा अभिनव उपक्रम तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी

पाचोरा (प्रतिनिधी) – ” कॉंग्रेस आपल्या दारी ” पाचोरा तालुका कॉंग्रेस ने अभिनव उपक्रमाला ग्रामीण भागात सुरुवात केली असून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा काॅग्रेस ने कॉंग्रेस आपल्या दारी असा उपक्रम सुरू केला असून याचा पहीला दौरा बाळद बुद्रुक येथे करण्यात आला. या उपक्रमात ग्रामीण भागातील समस्या, शासकीय योजनांची माहिती देणे, संघटन करुन युवकांना सक्रिय करण्याचे आवाहन सह कॉंग्रेस पक्षात प्रवेश देवुन नवीन समिती गठीत करण्याचा उद्देश घेण्यात आला आहे. बाळद बुद्रुक गावातील युवाशक्ती ने पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारींची वाजतगाजत मिरवणूक काढुन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, भाऊराव पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमात आपल्या भाषणात सचिन सोमवंशी यांनी कॉंग्रेस पक्षाचे संघटनवर भर देत जास्तीत जास्त युवकांना सहभागी होवुन शासनाच्या योजना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनते पर्यंत पोहचले पाहिजे शेतकरी नेते असलेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कॉंग्रेस आगेकूच करीत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसनेच विकास केलेला आहे तो जनते समोर ठेवा. पाचोरा तालुक्यात सहा मोठे धरण आणि असंख्य लघु धरणे कॉंग्रेस ने केली आहेत असा विकास सात जन्मात कोणतेही सरकार करु शकत नाही हे जनतेला सांगितले पाहिजे. कॉंग्रेस पक्षाचे पाचोरा तालुक्यावर माजी मंत्री स्व. कै के. एम. बापु पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या विकास हा उपकारच आहे. यावेळी तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, भाऊराव पाटील यांच्या समयोचित भाषणे झाली. यावेळी प्रदीप ठाकरे, सुनील बिर्हाडे, गणेश वाघ, समिर ठाकरे,योगश सोनवणे, गोकुळ सोनवणे, करण सोनवणे, दिपक ठाकरे, विजय माळी, सईद बेग अमोल सोनवणे, गुलफाम शेख ,कासम पिंजारी, सागर सोनवणे,शाहरुख पठाण, आसिफ शेख, आदी सह शेकडो युवकांना कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला. कॉंग्रेस जिंदाबाद च्या घोषणा करण्यात आल्या