नांद्रा येथे निवृत्त पोलीस निरीक्षक सुनील तावडे यांचा भव्य नागरी सत्कार

नांद्रा येथे निवृत्त पोलीस निरीक्षक सुनील तावडे यांचा भव्य नागरी सत्कार

राजेंद्र पाटील वृत्तसेवा नांद्रा (ता.पाचोरा )ता.११येथे खेरवाडी(बांद्रा) मुबंई पोलीस स्टेशनंला पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले नांद्रा येथील भूमिपुत्र दादासाहेब सुनील प्रल्हाद तावडे यांनी भारतीय सैन्य दलात 17 वर्षे पोलीस विभागात 20वर्षे प्रदीर्घ सेवा बजवून 31 मे रोजी खेरवाडी बांद्रा पोलीस स्टेशनला सेवानिवृत्त झाले.त्या निमित्त गावाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार गावात व्हावा या संकल्पनेतुन येथील *गड्या आपला गाव बरा..* या व्हाट्सप ग्रुपच्या मार्फत डॉ.वाय.जी.पाटील, दीपकदादा तावडे,राजु भैय्या पवार, समाधान भालेराव, एन.टी.तावडे, महेश गवादे,अजबराब पाटील, किशोर तात्या पाटील,गौतम लोखंडे, राजेंद्र तावडे,रघुनाथ लिंडाईत ललीत मुथा संजय जुलाल व इतर ग्रुप सदस्य यांच्या आयोजनातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी गड्या आपला गाव बरा ग्रुपच्या वतीने सुनिल तावडे व सौ.साधनाताई तावडे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.तर गावाच्या वतीने सरपंच अमोल सूर्यवंशी, उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे, विनोद तावडे, योगेश सूर्यवंशी,बालू सूर्यवंशी,किशोर खैरनार, भाऊसाहेब बाविस्कर, आनंदा पेंटर,दिलीप सोनवणे व सर्व ग्रामपंचायत कमिटी,महादेव मंदिर संस्थान व भजनी मंडळ ,महालक्ष्मी मित्र मंडळ, शिव स्मारक मित्र मंडळ, राजे संभाजी मित्र मंडळ, शिवप्रतिष्ठा मित्र मंडळ याबरोबर जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ,जळगाव एम.आय.डी.सी.चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची उपस्थित होते. वैयक्तिक सत्कारामध्ये क्रिएटिव्ह एज्युकेशन ग्रुप तथा पत्रकार प्रा.यशवंत पवार,विनोद बाविस्कर, पंकज बाविस्कर, माजी पं.स.सभापती पाचोरा नितीनदादा तावडे,पत्रकार राजेंद्र पाटील, पोलीस पाटील किरण तावडे,अनिल तावडे, अमोल तावडे सागर तावडे ,साहेबराव तावडे, वाल्मीक बाविस्कर,परमेश्वर बाविस्कर,प्रदीप बाविस्कर,डिगंबर पाटील,गणेश सुर्यवंशी, भुषण तावडे, भैया भदाणे यांनी व इतर मान्यवरांनी सत्कार केला.बस स्टॅन्ड वरून भव्य वाचत गाजत मिरवणूक काढून निवृत्त पोलीस निरीक्षक सुनील तावडे यांनी गावातील ग्राम दैवत व शिवस्मारक या ठिकाणी पूजन व माल्यार्पण केले .यानंतर महादेव मंदिर प्रांगणात सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी निवृत्त पोलीस निरीक्षक सुनील दादा तावडे यांनी आपल्या मनोगतातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपण प्रसंगी दुसऱ्याचे कपडे परिधान करून सैन्य भरतीला सामोरे जाऊन अगोदर देश सेवेसाठी सैन्यदलात व नंतर पोलीस दलात शिपाई ते एम.पी.एस.सी मार्फत पोलीस उपनिरीक्षक तर पी. आय ..पर्यंत परीक्षा देत यशस्वी वाटचाल करत यशाचे शिखर कसे गाठले यामागे त्यांनी आपल्या कुटुंबातील आई-वडील यांचा आशीर्वाद व पत्नीची साथ कशी लाभली ते आपल्या मनोगतातून सांगितले. याबरोबरच त्यांनी सुरगाणा तालुक्यात अतिशय आदिवासी व दुर्गम भागात पहिल्याच पोस्टिंगला केलेलं सामाजिक जागृती चे कार्य आपल्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून दाखवून गावाला वर्दीतील पोलिसांचं सामाजिक कार्य व देशभक्ती याविषयी लोकांना भारावून टाकले.त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी सौ साधनाताई तावडे यांनीही त्यांना खंबीर साथ दिल्याची त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले याप्रसंगी डॉ.वाय .जी .पाटील नितीन तावडे ,विनोद बाविस्कर, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ,वाल्मीक बाविस्कर,महेश गवादे व कवी स्वप्निल बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन सौ. साधनाताई यांनी केले गड्या आपला गाव बरं.. व्हाट्सएप ग्रुपचे व गावकऱ्यांचे आभार मानले इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन गावाच्या वतीने केले म्हणून भविष्यात गावासाठी नक्कीच विधायक कार्यात पुढाकार घेऊ अश्या भावना व्यक्त केल्या. सुत्रसंचलन गजानन ठाकूर सर यांनी केले.
फोटो ओळ.
नांद्रा(ता.पाचोरा) येथील महादेव मंदिराच्या आवारात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सुनील तावडे,सौ.साधना तावडे यांचा सहपत्नीक सत्कार करताना गड्या आपला गाव बरा ग्रुपचे सदस्य डॉ.वाय.जी.पाटील,आर.डी.पवार, समाधान भालेराव,एन.टी.तावडे,दिपक तावडे, महेश गवादेसर,अजब पाटील, किशोर तात्या पाटील आदी.