जळगाव काॅग्रेसचे उपाध्यक्ष तथा येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाशभाऊ भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान दिले.

जळगाव काॅग्रेसचे उपाध्यक्ष तथा येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाशभाऊ भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान दिले.

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश भालेराव यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे रक्तदान शिबिर अविनाशभाऊ मित्र मंडळ व रेडप्लस ब्लड बँक, जळगांव यांनी आयोजन केले होते. यावेळी ५२ लोकांनी रक्त दान केले. महाराष्ट्र शासनाने कोविड काळात राज्याला रक्ताची गरज असल्याचे जाहिर केले असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान केले. सकाळी ११ वाजेपासुन सायंकाळपर्यंत शिबिर सुरु होते. यावेळी अॅड.अविनाश भालेराव, माजी शिवसेना शहर प्रमुख भरत खंडेलवाल, संदीप महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन राजू अहिरे, अविनाश पवार, रहमान देशमुख, लखन वाघ, अमोल गायकवाङ, अविनाश खैरनार, आर्यन मोरे, दिपक सोनवणे, धिरज खेडकर, दिपक गायकवाड, शकलेन शेख, रितिक ब्राम्हणे यांनी केले. तर रेड प्लस जळगावचे डॉ. विवेक महाजन, डॉ. भरत गायकवाड, प्रकाश सपकाळ यांनी सहकार्य केले. अविनाश भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त तरूणांनी उत्सुर्तपणे या शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले