गाळण येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

गाळण येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न…!

पाचोरा:- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गाळण येथे सुमारे 250 तरुणांनी पक्ष प्रवेश केला.आज सायंकाळी 5:00 वा. शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी हडसन तसेच विष्णू नगर येथील अनेक तरुणांनी शिवबंधन हाती बांधले.सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटन तसेच पक्ष मजबुतीसाठी आपणा सर्वांना खूप मनापासून मेहनत घ्यावयाची आहे व माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात बळकट करून विजयाचा झेंडा रोवायचा आहे असे नमूद केले.
याप्रसंगी तालुका प्रमुख शेतकरी सेना श्री. रमेश बाफना तालुका प्रमुख श्री.शरद पाटील, गाळण गावाचे सरपंच राजेंद्र रामभाऊ सावंत, उपसरपंच ईश्वर चिंधा पाटील, ज्येष्ठ माजी सैनिक शंकर काशीराम पाटील, माजी सरपंच दगडू पाटील, माजी उपसरपंच जितेंद्र राजपूत, ज्येष्ठ शिवसैनिक नाना बोरसे, उज्वल राजपूत, गोविंदसिंग राजपूत, राजेंद्र परीट, तालुका उपसमन्वयक डॉ. भूषण प्रकाश पाटील, तालुका युवा समन्वयक ओम बाबासाहेब बोरसे, रोहन राजपूत, सर्जेराव पाटील, तालुका युवा उप संघटक भाऊलाल राठोड तसेच विविध पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.