Home पाचोरा तालुका डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे – किसन सूर्यवंशी 

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे – किसन सूर्यवंशी 

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे – किसन सूर्यवंशी

 

 

पंचशील मित्र मंडळ द्वारा आयोजित म्हसदी.ता :साक्री:जि: धुळे;येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि १३ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील विद्रोही वक्ते किसन सूर्यवंशी यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते , कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . “बहुजनांचे बाबासाहेब व फुले शाहू आंबेडकरी चळवळ ” संविधानिक आव्हाने या विषयावर भाष्य करत असताना प्रमुख वक्ते म्हणून किसन सूर्यवंशी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांक ओबीसी व मुस्लिम या समाजासाठी संविधानामध्ये कशा पद्धतीने तरतुदी करून ठेवलेले आहेत ; बाबासाहेब यांनी ओबीसी समाजासाठी किती मोठा त्याग केलेला आहे तसेच आदिवासी बांधवांसाठी सुद्धा घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांचा लढा हा संपूर्ण बहुजनासाठी होता आणि बाबासाहेब संपूर्ण देशाचे उद्धारक करते आहेत असे आपल्या भाषणात सांगितले .

तसेच महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्री चे वैचारिक नाते कशा पद्धतीने आहेत याचे अनेक इतिहासातील संदर्भ ,विविध घटना ,प्रसंग देऊन दीड तास या विषयावर जनतेला सखोल असं मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या प्रस्ताविक किरण मोहिते सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री सूर्यवंशी सर यांनी केले.

Don`t copy text!