Home महाराष्ट्र मांडवे,साकेगाव,चेकेवाडी, खरवंडी,शिरुर कासार गावातील बचत गटातील महिलांची फसवणूक, हाताचे ठसे घेऊन कर्जाची...

मांडवे,साकेगाव,चेकेवाडी, खरवंडी,शिरुर कासार गावातील बचत गटातील महिलांची फसवणूक, हाताचे ठसे घेऊन कर्जाची रक्कम इतरत्र वळवली?

मांडवे,साकेगाव,चेकेवाडी, खरवंडी,शिरुर कासार गावातील बचत गटातील महिलांची फसवणूक, हाताचे ठसे घेऊन कर्जाची रक्कम इतरत्र वळवली?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

महिलांच्या बचत गटातील महिलांच्या हाताचे ठसे घेऊन त्यांच्या मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम इतरत्र वळवली असल्याची घटना अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे,साकेगाव,चेकेवाडी, खरवंडी,शिरुर कासार या गावात घडली आहे.या प्रकरणी अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.एका खासगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हा गैरप्रकार झाला आहे.या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाथर्डी तालुक्यातील मांडवे,साकेगाव,चेकेवाडी, खरवंडी,शिरुर कासार या गावातील बचत गटातील महिलांच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन त्यांच्या नावाने परस्पर बोगस कर्ज काढून कर्जाची रक्कम इतरत्र दुसऱ्याच खात्यात जमा केली आहे. तसेच महिलांनी भरलेले हप्ते फायनान्स कंपनीकडे जमा न करता ते इतरत्र वळविले आहेत.अशा प्रकारचे गैर कारभार झाले असल्याचे महिलांच्या तालुका मासिक बैठकीत लक्षात आले आहे.या मासिक बैठकीत अनेक गावांतील महीलांनी आपली फसवणूक झाल्याचे कबूल केले आहे.त्यामुळे या खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या अनेक गावांतील बचत गटातील महीलांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.संबंधित गैरप्रकार करणारा अधिकारी हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथिल रहिवासी आहे.त्यांनी अनेक महिलांच्या नावावर कर्ज काढून ती रक्कम संबंधित महिलांच्या खात्यात न भरता इतरत्र वळवली असल्याचे दिसून आले आहे.काही महिलांच्या आधार कार्डाला वेगळाच मोबाईल नंबर लींक करून त्या द्वारे पैसे काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आता फक्त वीस पंचवीस महिलांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.पण हा आकडा फार मोठा असन्याची शक्यता आहे.या प्रकारामुळे बचत गटातील महिला वर्गात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.हा गैर कारभार उघड होताच पाथर्डीतील फायनान्स कंपनीच्या कार्यालया कडून या अधिकाऱ्याची कसुन चौकशी सुरू झाली आहे.संबंधित अधिकाऱ्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली असून तालुक्यातील अजून एकुण किती महिलांची किती रकमेची फसवणूक झाली आहे याची कसुन चौकशी सुरू झाली आहे.हा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस होताच या महिलांकडून जास्त प्रमाणात बोभाटा होउ नये म्हणून काही महिलांचे पैसे परत माघारी दिल्याचे सांगितले गेले आहे. सर्व महिलांचे पैसे परत दिले नाही तर थेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा बचत गटातील महिलांनी दिला आहे.एका प्रकरणात एका अशिक्षित आणि अडाणी असलेल्या महिलेच्या नावावर शेळी पालनासाठी एक लाख रुपये कर्ज काढण्यात आले होते.दोन वेळेस तीच्या हातातील अंगठ्याचे ठसे घेऊन तीची संपूर्ण रक्कम दुसऱ्याच खात्यात जमा केली आहे.तर दुसऱ्या एका प्रकरणात सर्व सामान्य घरातील अत्यंत गरीब असलेल्या आणि मोठ्या घरात जाऊन धुणीभांडी करणाऱ्या एका तरुणीच्या नावावर बोगस कर्ज काढून तीला एक रुपया ही न देता तीच्यावर आता न घेतलेल्या कर्जाचे हप्ते फायनान्स कंपनीकडे भरण्याची वेळ आली आहे.तीला आता विनाकारण मोल मजुरी करून हे कर्ज फेडावे लागत आहे.काही बचत गटातील महिलांकडून तर कर्जाच्या नावाखाली हप्ते वसूल करण्यात आले आहे. परंतु त्यांना जुन्याच पावत्या देण्यात आल्या आहेत.पण ती रक्कम संबंधित कंपनीकडे जमाच झालेली नाही.हाच गैरप्रकार पाथर्डी तालुक्यातील काही सहकारी सोसायट्या मध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. सोसायटीच्या सचिवाने एका शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज काढून ती रक्कम स्वतः हडप केली.कर्ज माफ होईल म्हणून ती रक्कम भरलीच नाही.मात्र अहिल्या नगर जिल्हा सहकारी बँकेने ३१ मार्च अखेर कर्ज घेतलेल्या सर्व थकबाकीदार सभासदांना एका नोटीसही द्वारे कर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा हा बोगस कर्जाचा प्रकार उघडकीस आला होता.बोगस कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचे नाव थकबाकीदार सभासदांच्या यादीत आलं आणि संबंधित शेतकऱ्याने सोसायटी विरोधात गावात आकां डतांडव सुरू केले तेव्हा सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव यांचे चांगलेच धाबे दणाणले होते.मग संबंधित सोसायटीच्या सचिवाने बोगस कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचे त्यांच्या घरी जाऊन रात्री अंधारात पाय धरले आणि शेतकऱ्यांच्या पायावर लोटांगण घालत सांगितले की मी तुला काहीच होऊ देणार नाही फक्त या बोगस कर्जाचा गावात बोभाटा करून माझी बदणामी होऊ देवू नको.मी सर्व कर्ज भरून टाकतो म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.हा सचिव अनेक शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करताना त्या शेतकऱ्यांना तिसगाव येथील हाॅटेल मध्ये नेवून त्यांच्या कडून फुकटात पार्ट्या झोडत आहे.अनेक वर्षे त्याच गावात राहुन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ही ब्लॅकमेल करीत आहे.एका प्रकरणात पोलीसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.तेव्हा त्याचे नाव उघड होणार आहे.

Don`t copy text!