सुजय विखेंनी अजित पवार यांची भेट घेताच नाहटा,नागवडे च्या निवडी जाहीर

सुजय विखेंनी अजित पवार यांची भेट घेताच नाहटा,नागवडे च्या निवडी जाहीर

(सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील आमदारांच्या घड्याळाच्या काट्या सारख्या चालणाऱ्या हालचाली पाहून भाजपाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली .जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या हालचाली वर बारीक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना तात्काळ जिल्हा अध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करण्यास भाग पाडले.भाजप,अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचा शिंदे गट यांची राज्यात महायुती असल्यामुळे होउ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष हे महायुतीच्या निर्णयावर ठाम रहातीच यांची खात्री नसल्याचे लक्षात येताच भाजपचे नेते विखे पाटील यांनी उघडपणे ना.अजित पवार यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. ना.अजित पवार यांनी या आमदाराला चांगल्या कानपिचक्या दिल्या आहेत. जिल्ह्यातील बंडाची भाषा करणाऱ्यांचे ताबूत आता थंड झाले आहेत.तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची जाहीरपणे घोषणा करण्यास भाग पाडले आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड जाहीर केली आहे.तसेच नुकतेच काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळपात सामील झालेले नागवडे कारखान्याचे चेरमन राजेंद्र नागवडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र नुकतेच एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले आहे.यामुळे विखे यांनी आपली मित्र पक्षावरील पकड मजबूत केली आहे.अधिक्रुत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदरच पदाधिकारी निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. शह- काटशहाच्या राजकारणाला आता खरी सुरवात झाल्याचे दिसून येत आहे.