शेतकर्यांची दिवाळी गोड करा पाचोऱ्यात महाविकास आघाडीचे आज रस्तारोखो आंदोलन
पाचोरा (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडी ने आज दि १६ रोजी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.
पाचोरा तालुक्यात मागिल काही दिवसांत अचानक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे. जे अनुदान जाहीर केले ते दिवाळी च्या आधी त्याच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल. कपाशी साठी सीसीआय सुरू करा,ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना ना. गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले एक लाख त्वरीत द्या,सोयाबीन व ज्वारी ची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा, शेतकरी अनुदान घोटाळा ची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोखस्वरुपात द्या, विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या,अशा विविध मागण्यांसाठी आज दि १६ रोजी सकाळी ११ वाजता जारगांव चौफुली पाचोरा येथे रस्तारोखो होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहीले आहे त्यांनी त्वरित येथे यावे तसेच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कॉग्रेस, शिवसेना उबाठा सह राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी शेतकरी संघटने कडुन करण्यात आले आहे.