माजी पोलीस पाटील स्व.मळूपाटील उघडे यांच्या अठराव्या पुंण्य स्मरणा निमित्ताने श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या नुतन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा युवा नेते कृष्णा राजळे यांच्या हस्ते कोपरे येथे मोठ्या उत्साहात संपन्न

माजी पोलीस पाटील स्व.मळूपाटील उघडे यांच्या अठराव्या पुंण्य स्मरणा निमित्ताने श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या नुतन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा युवा नेते कृष्णा राजळे यांच्या हस्ते कोपरे येथे मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण आयुष्य भर पोलिस खात्याशी एकनिष्ठ राहिलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे गावचे माजी पोलीस पाटील स्व.मळूपाटील बाळाजी उघडे यांच्या अठराव्या पुंण्य स्मरणा निमित्ताने श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा युवा नेते कृष्णा राजीव राजळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात कोपरे येथे संपन्न झाला.धनगर वाडीचे ह.भ.प. भागवताचार्य शंकर महाराज भागवत यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी महाभारता तील कथा सांगून अनेकांची मने जिंकून घेतली.जवखेडे येथील ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर यांचे ते पट्ट शिष्य होते.स्व. मळूपाटील उघडे यांनी वीस वर्षे कोपरे गावचे पोलिस पाटील म्हणून काम केले होते.गेली अठरा वर्षे झाली सातत्याने दरवर्षी त्यांचा हा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होत आहे.आजकाल समाजात स्वतःला प्रतिष्ठीत म्हणून घेणाऱ्या काही औलादी या जिवंतपणी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत ही खरी आजची वस्तुस्थिती आहे. परंतु उघडे पाटील परीवारातील भाऊसाहेब उघडे, बबनराव उघडे, शिवाजीराव उघडे यांनी गेली अठरा वर्षे झाली आपल्या स्वर्गीय वडीलांचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करून आपल्या वडीलांना खरी आदरांजली अर्पण केली आहे.ही उघडे घराण्याची आजपर्यंतची थोर परंपरा आहे.श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे चेरमन पोपटराव पडोळे आणि सचिव मारूती दगडखैर साहेब यांच्या समन्वयातून या नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.भाजपचे नेवासा तालुक्यातील नेते अशोकराव कोळेकर,विखे पाटील घराण्याचे खंदे समर्थक राजूममामा तागड, वाघोली सोसायटीचे चेरमन पांडुरंग दातीर,आदिनाथ नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेरमन बाबासाहेब बर्डे,कोपरे गावचे माजी सरपंच रमेशराव आव्हाड, हनुमान टाकळी सोसायटीचे माजी चेरमन अशोकराव काजळे,वडुले खुर्द येथील ह.भ.प. नवनाथ महाराज आव्हाड,मीरीचे महादेव कुटे पाटील,माका येथील भाजपा नेते संभाजीराव लोंढे,निलेश महानवर,यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी हनुमान टाकळी सोसायटीचे संचालक संजय बर्डे,अण्णासाहेब बर्डे,अशोक बर्डे,माजी संचालक संभाजी दगडखैर,सचिव बाळासाहेब ताठे, विनोद खंबायत, वाघोली दुधडेअरीचे चेरमन दत्तात्रय दातीर, सोसायटीचे माजी चेरमन सुभाष दातीर,कोपरे ग्रामपंचायत सदस्य शंकरराव उघडे,मंगल वाघमोडे,दिपक धनवटे,आडगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुखदेव शेंडे,मळू बोरूडे,अर्जुन आंधळे, रामकिसन आंधळे,वसंतराव आव्हाड,चारूदत वाघ,वैभव आंधळे,यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रिती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.