श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त “भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिम समुदायाचे योगदान”

पाचोरा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा. जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माननीय दादासाहेब श्री खालील देशमुख, चेअरमन श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा यांचे “भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिम समुदायाचे योगदान” या विषयावर दिनांक 23 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. माननीय दादासो देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिम समुदायाने केलेल्या अनमोल अशा योगदानाचे सविस्तर विवेचन केले. या विवेचनात भारतातील विविध मुस्लिम राजांच्या राजवटी पासून भारतीय स्वातंत्र्य पर्यंतचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी देखील स्वातंत्र्यसंग्रामातील मुस्लिम समुदायाच्या योगदानाचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा विद्यार्थी विकास अधिकारी प्रो. डॉक्टर जे.व्ही.पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ.के एस इंगळे यांनी केले. तर प्रा. आर. बी. वळवी यांनी आभार प्रदर्शन केले. त्याप्रसंगी प्रो.डॉ.जे.डी.गोपाळ, IQAC समन्वयक प्रा.एस.टी.सूर्यवंशी प्रा. डॉ.एस.बी. तडवी, प्रा.वाय. बी.पुरी, प्रा.डॉ.माणिक पाटील प्रा.स्वप्निल भोसले, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ.प्राजक्ता शितोळे, प्रा.इंदिरा लोखंडे, डॉ.क्रांती सोनवणे, प्रा.अधिकराव पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्निल पाटील, डॉ.जितेंद्र सोनवणे यांचे अनमोल सहकार्य लाभले तथा सदर कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.