पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गो.से.हायस्कुलचा प्रथम क्रमांक

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गो.से.हायस्कुलचा प्रथम क्रमांक

पाचोरा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार दि.20.01.2023 रोजी न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल पाचोरा येथे आयोजित केले होते. त्यात पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा येथील तनिष्का पाटील व अंजली सिनकर या ई.10 वी च्या विद्यार्थिनींनी बनविलेल्या बायोगॅस प्लांट या उपकारणांस माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला.या उपकरणाची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.त्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक श्री. अनिल पाटील सर व श्री.पी.पी. नैनाव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी पाचोरा विभागाचे प्रांतधिकारी मा.श्री. विक्रम बांदल साहेब, तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.श्री. गिरीष जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती. सरोज गायकवाड मॅडम व इतर मान्यवर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसो.श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासो. श्री. संजय वाघ, व्हा. चेअरमन मा. नानासो.श्री.व्ही.टी.जोशी, मानद सचिव मा. दादासो. अँड.श्री.महेश देशमुख,शालेय समिती चेअरमन मा. दादासो. श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा. आण्णासो. श्री. वासुदेव महाजन,सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील, श्री.ए. बी.अहिरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कौतुक केले आहे.