श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे शासकीय रेखाकला परीक्षा निकाल जाहीर
पाचोरा ( प्रतिनिधी) —
एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट ड्रॉइंग परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. या परीक्षेचा उद्देश स्थिर-जीवन आणि मेमरी ड्रॉइंगमधील कलात्मक कौशल्यांचे मूल्यांकन करणे हा आहे.
आमच्या शाळेचा शासकीय रेखाकला परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हया परीक्षेचे गुण इ 10 परीक्षेत सवलत गुण म्हणून विद्यार्थ्यांना मिळत असतात. फाईन आर्ट या परीक्षेसाठी या 10 मार्कांचा उपयोग.होतो.इंटरमिजिएट श्रेणी मध्ये 17 विद्यार्थी व इलेमेंटरी विषयात 7 विद्यार्थी असा निकाल लागला असून या विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन संजय वाघ, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख माजी पर्यवेक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्याचा गुणगौरव केला कार्यक्रमास उपमुख्याध्यापक आर एल पाटील पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल,पर्यवेक्षिक रहीम तडवी, सूत्रसंचालन रवींद्र बोरसे व आभार प्रदर्शन ए बी अहिरे यांनी मानले..हया विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक सुनील भिवसने, सुबोध कांतायन , प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.