महावितरण MSEB महीला मंडळाचा स्तुत्यप्रत उपक्रम हळदी कुंकू कार्यक्रमास रोपटे चे वाटप दिला पर्यावरणपूरक संदेश

महावितरण MSEB महीला मंडळाचा स्तुत्यप्रत उपक्रम हळदी कुंकू कार्यक्रमास रोपटे चे वाटप दिला पर्यावरणपूरक संदेश ….

दि.19.01.2023 रोजी रामानंद परीसर येथे महावितरण MSEB महीला मंडळ यांनी हळदी कुंकू कार्यक्रमध्ये महीला यांना बदाम, वटवृक्ष, पिंपळ,बेल, तसेच फुलांचे रोपाचे वाटप करून पर्यावरण पूरक असा संदेश दिला आहे. दर सालाप्रमाणे प्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तरी या वर्षी ही सामाजिक बांधिलकी जोपासून महागड्या वस्तूचे वाटप न करता प्रत्येक महिलेस रोपे देण्यात आली व रोपे लावून जतन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली……या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्हणून सौ.संध्या तायडे महाराष्ट्र ईलेक्ट्रीकसिटी वर्कर्स फेडरेशन युनियन महीला प्रतिनिधी तसेच सौ.युगंधरा ओहळ सहाय्यक अनुदेशक हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सौ.स्वाती रामकुवर, सुवर्णा कोळी,प्रिती गोरवाडकर,हर्षा चोधरी, पल्लवी गांधीले, स्वाती कुटे, दिप्ती सिंन्हा, तारा मेहेत्रे, राणी जाधव, जया डोंगरे, स्वप्नाली सरोदे, प्रिय॔का नाफडे, दिपाली आहेर, वैशाली चौधरी, आरती पवार या सर्वांनीच कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वी केला परीसरातून 100ते 150 महीला उपस्थित होत्या…