चोपडा महाविद्यालयात ‘महिला सुसंवाद’ आणि ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘महिला सुसंवाद’ आणि ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा: येथे बारामती ऍग्रो लिमिटेड आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी सकाळी १० वाजता मकर संक्रांतीनिमित्त ‘हळदी कुंकू’, ‘महिला सुसंवाद’ व ‘युवतींसाठी हेल्थ अँड हायजिन’ अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालक सौ.सुनंदाताई पवार यांच्या हस्ते होणार असून सौ.सुनंदाताई पवार या ‘महिला सबलीकरण आणि गृह उद्योग’ या विषयांवर महिला भगिनींशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती.आशाताई विजय पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील व सावी फाऊंडेशन अकलूजच्या अध्यक्ष सौ. सविता रणजीत व्होरा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी चोपडा परिसरातील महिला, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी केले आहे.