पाचोरा येथे गायत्री परिवारातर्फे भूलाबाई कार्यक्रम आशीर्वाद हॉल येथे उत्साहात संपन्न झाला

पाचोरा येथे गायत्री परिवारातर्फे भूलाबाई कार्यक्रम आशीर्वाद हॉल येथे उत्साहात संपन्न झाला

 

 

 

पाचोरा, प्रतिनिधी ! (अनिल आबा येवले यांचे कडून)…..

सध्याच्या सोशल मीडियाच्या वातावरणात नवीन पिढी गुंतलेली असते आपली पारंपारिक संस्कृती त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम गायत्री परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आपल्या खानदेशातील पूर्वी लहान मुली घरोघरी गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी गुलाबाई बसवीत, सायंकाळी एकेकीच्या घरी जाऊन टी परी खेळत, त्यावेळी काही ऐलमा पैलमा सारखे लोकगीत म्हणत. आता काळाच्या ओघात हे सर्व मागे पडत चाललय ,गायत्री परिवारातर्फे बाल संस्कार वर्ग चालविले जातात, सा.प. शिंदे शाळा ज्ञान प्रबोधिनी संस्कार वर्ग रंगार गल्ली ,देशमुख वाडीतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या मुलींसोबत गायत्री परिवाराच्या भगिनी पण सहभागी झाल्या, आपल्या बालपणीच्या आठवणीत रमल्या ,खूप खूप आनंद लुटला. आजच्या पिढीला याची ओळख व्हावी, संस्कृती संवर्धनात सहजीवनाचा संस्कार व्हावा या उद्देशातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा सोनार यांनी केले परीक्षक म्हणून सौ. अनघा येवले आणि सौ. छाया खंडेलवाल उपस्थित होत्या.