सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांनी केला ७५ वा वाढदिवस साजरा

सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांनी केला ७५ वा वाढदिवस साजरा

गोराडखेडा ता. पाचोरा येथील रहिवासी जिल्हा बँकेचे निवृत्त शाखाधिकारी श्री रामदास आनंदा पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम करत आदर्श वाढदिवस साजरा करण्यात आला. पाचोरा येथील आधारवड या ठिकाणी गोरगरीब व गरजूंना भाजी, पोळी,भात, शेव, जलेबीचे भोजन देऊन अन्नदान करण्यात आले. यावेळी विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर, नगरसेवक विकास पाटील, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष एस ए पाटील, जगदीश तेली, आधारवड संस्थेचे प्रवीण पाटील, राहुल पाटील, सुधीर पाटील, प्रमोद पाटील व कुटुंबीय उपस्थित होते.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालय गोराडखेडा बु, जि प मराठी शाळा व नवजीवन विद्यालय पाचोरा येथे पंच्याहत्तर झाडांचे रोपण केले. प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, केंद्रप्रमुख श्री बीडकर, ग्रामसेवक डी बी गुरवे, जिप शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार, यासह गावांतील धर्मराज पटील, नाना वेडू पाटील, मनोज आप्पा पाटील, विजय गोपीचंद पाटील, शांताराम झगा पाटील, नारायण पवार, राजेंद्र मराठे, जनार्दन पाटील, सुभाष मोरे, जगदीश पाटील, प्रफुल्ल भोईटे, संदिप पाटील, रवींद्र पटील, नवल पाटील, नीलेश पाटील, गोपाल पाटील, ईश्वर पाटील, समाधान पाटील, जिप मराठी व उर्दू शाळेतील सहशिक्षक, नातेवाईक व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
रामदास पाटील हे जिल्हा बँकेचे निवृत्त शाखाधिकारी असून न्यू हायस्कूल भोकरदन येथील सहशिक्षक शिवराणा व्याख्याते संतोष पाटील व दैनिक देशदूतचे पत्रकार, गोराडखेडा ग्राम. सदस्य, निवजीवन विद्यालयाचे सहशिक्षक मनोज पटील यांचे वडील आहेत. उच्चशिक्षित व सुसंस्कृत कुटूंब घडविणारे रामदास पाटील यांनी आपल्या वयाच्या पंच्याहत्तरीतही समाजाशी व पर्यावरणाशी असलेली आपली नाळ दाखवत सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना देऊन त्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल गावातील स्नेही जणांकडून व पर्यावरणप्रेमींकडून त्यांचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.