के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखतीत विद्यार्थ्यांची निवड

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखतीत विद्यार्थ्यांची निवड

 

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखतीत विद्यार्थ्यांची निवड : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखतीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते . जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी या परिसर मुलाखतीत सहभाग घेतला . विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी ए आर एम एस इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी हजर होते .मुलाखतीत विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य ,सवांद ,मिळवलेले गुण यावर एकूण 24 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली .त्यात 21 विद्यार्थी के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव मधील आणी इतर महाविद्यालयातील 3 असे एकूण 24 जण निवड यादीत आलेत. मुलाखतीला विविध शाखेचे विद्यार्थी हजर होते . परिसर मुलाखतीचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा .मनीष महाले यांनी केले . या प्रसंगी के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाला आय क्यू ए सी समनव्यक प्रा कल्पेश महाजन , ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा गणेश पाटील , प्रा राहुल पटेल , प्रा सचिन नाथ यांची उपस्थिती होती .