शेवगाव येथे मातोश्री सईबाई वाघमारे,आणि आमदार राजळे, अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते कल्पना पेंटसचा शुभारंभ संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मीरी रोडवर असलेल्या “कल्पना पेंटस्” या दुकानाचा शुभारंभ शेवगाव तालुक्याचे ट्राॅफिक हवालदार देविदास वाघमारे यांच्या मातोश्री सईबाई सहादु वाघमारे आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा तालुक्यातील कुकाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते अब्दुलभाई शेख हे आवर्जून उपस्थित होते. कल्पना पेंटस् या दालनात घर बांधकामासाठी लागणारे विविध प्रकारचे रंग उपलब्ध होणार आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी हे दालन सदैव तत्पर राहणार आहे. शेवगाव शहरातील अनेक मान्यवरांनी या दुकानाच्या शुभारंभा प्रसंगी हजेरी लावली होती. शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, वंचित आघाडीचे नेते किसनराव चव्हाण, रिटायर्ड डि वाय एस पी उत्तमराव बारस्कर, लोळेगावचे बिरोबा भक्त बाबाजी बनसोडे, बबनराव भुसारी, सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब फसले, गणेश कराड, अनंत उकिरडे, भास्कर तरटे, बाबासाहेब भुमरे, पवार मॅडम,विक्रम लांडे सर, मोहनराव वाघमारे,अभय आव्हाड यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.