श्री गो से हायस्कूल पाचोरा चे उपमुख्यद्यापक मा. एन आर ठाकरे सर यांना राज्यस्तरीय ‘ क्रीडारत्न पुरस्कार’

श्री गो से हायस्कूल पाचोरा चे उपमुख्यद्यापक मा. एन आर ठाकरे सर यांना राज्यस्तरीय ‘ क्रीडारत्न पुरस्कार’

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित.
श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील उपमुख्यद्यापक एन .आर .ठाकरे. यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान जिल्हा अहमदनगर या संस्थेने राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, मानद सचिव ऍडव्होकेट महेश देशमुख, शालेय समितीचे चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए बी अहिरे, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर, क्रीडा शिक्षक संजय करंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.