पाचोरा महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पाचोरा महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पाचोरा(प्रतिनिधी) येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व दे वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 30 जानेवारी व 31 जानेवारी 2024 रोजी दोन दिवस वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक 30 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे .यांच्या हस्ते होणार आहे या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुणदर्शन यात गीतगायन,नृत्य,नाटक,फॅन्सी ड्रेस,मिमिक्री या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तर 31 जानेवारी 2024 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा विभागातील पारितोषिक वितरण व समारोप समारंभ सुप्रसिद्ध साहित्यिक,विचारवंत संजय कळमकर(अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाने होईल या दिवशी कार्यक्रमाचे अधक्ष माजी आमदार दिलीप वाघ. असणार आहे तर प्रमुख अतिथी पा.ता.सह.शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संस्थेचे मानद सचिव ॲड.महेश देशमुख, व्ही.टी जोशी,प्रा.सुभाष तोतला सर व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थीत राहाणार आहे.