लोहारा येथे ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे जाहीर कीर्तन

लोहारा येथे ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे जाहीर कीर्तन

लोहारा ता. पाचोरा प्रतिनिधी— येथील ग्राम उत्सव समिती व ग्रामस्थांतर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त रात्री ठीक ८ वाजता महाराष्ट्र भूषण ,समाज प्रबोधनकार, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती देशमुख(इंदुरीकर महाराज)यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण,युवा क्रीडा मंत्री ना.गिरीष महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.तर भाजप नेते संजय शांताराम पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे,मधुकर काटे,ईश्वर शिंदे ,रामचंद्र भिवसने,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या जाहीर कीर्तनाचा लोहारा व परिसरातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन ग्राम उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रमेश शेळके, सचिव दिपक पवार, खजिनदार महेंद्र शेळके,सहखजिनदार रमेश शिंदे, व्यवस्थापक कैलास चौधरी, सहव्यवस्थापक शरद सोनार,राहुल कटारिया, कृष्णराव शेळके,दिलीप चौधरी, दिपक खरे,ज्ञानेश्वर राजपूत, विवेक जाधव,संतोष पालिवाल,विकास देशमुख, उमेश देशमुख, संजय शिंदे,कैलास खाटीक,राजु चौधरी, भूषण शिवदे, संभाजी चौधरी, विवेक जाधव आधार खाटीक, शेनफडु कोळी,यासह आयोजक व ग्रामस्थ मंडळ तर्फे करण्यात आले आहे.