गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात सहजयोग साधना कार्यक्रम संपन्न

_गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात सहजयोग साधना कार्यक्रम संपन्न….!!!!!_

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे सहजयोग परिवारातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सहजयोग साधना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांंच्या मनाची एकाग्रता वाढावी,स्मरणशक्ती तरबेज व्हावी,ध्यानधारणेतून आत्मविश्वास प्राप्त व्हावा,ऐन तारुण्यात व्यसनाधीन होणाऱ्या तरुणाईस अटकाव करणे,विद्यार्थ्यांंचा बुध्दिगुणांक वाढावा आदि उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन भावी पिढी सुसंस्कारीत करण्याचे महत्कार्य सहजयोग परिवारातर्फे नेहमी आयोजित केले जाते असे परिवाराचे योगेश ठाकूर तसेच स्मिता ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
निर्मलादेवी प्रतिष्ठान पुणे तर्फे जवळजवळ १८० देशात योगाधारणा केंद्र चालतात,यावेळी भटूआप्पा वेळीस्कर,दिप्ती पाटील,सुरेखा वेळीस्कर,कांचन वेळीस्कर,जगन पाटील,निखिल वेळीस्कर,प्रथमेश ठाकूर आदि सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.