पवित्र पोर्टल प्रक्रियेतून उर्दू शाळांना शिक्षक नक्कीच मिळणार: समाधान पाटील

पवित्र पोर्टल प्रक्रियेतून उर्दू शाळांना शिक्षक नक्कीच मिळणार: समाधान पाटील

उर्दु शिक्षक कमी असलेल्या शाळांना महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टल प्रणालीतून होणारी शिक्षक भरती मुळे शिक्षक नक्कीच मिळणार,असे आश्वासन पाचोरा पंचायत समिती येथे नव नियुक्त गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील यांनी भेट साठी आलेल्या नगरदेवळा ग्रामस्थांना दिले.या वेळी नगरदेवळा ग्रामस्थ तर्फे समाधान पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी साहेबांच्या वेळ मागून गट साधन केंद्र पाचोरा येथे भेट घेतली. या वेळी थोर समाज सेवक व माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अब्दुल गणी शेख कमरोददीन यांच्या हस्ते साहेबांच्या सत्कार करण्यात आला. नगरदेवळा गावात उर्दू शाळेत भरपूर पटसंख्या असून मात्र शिक्षकांची संख्या कमी आहे.262 विद्यार्थ्यांवर मात्र तीन शिक्षक कार्य करत आहे. गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवनियुक्त गटशिक्षण अधिकारी यांनी काही तोडगा काढावा. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त नगरदेवळा उर्दू शाळा नव्हे तर पूर्ण पाचोरा तालुका मध्ये उर्दू शिक्षकांची संख्या कमी आहेत. नगरदेवळा उर्दू, लोहारा उर्दू, पिंपळगाव उर्दू शाळा येथे उर्दू शिक्षकांची संख्या पटसंख्या प्रमाणे भरपूर कमी आहे. शिक्षक मागणी संदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहे.आम्ही आपल्या प्रमाणे शिक्षकांची संख्या कमी असलेल्या शाळांच्या बंदोबस्त आपल्या स्तरावर करत आहे.शिक्षण विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अब्दुल गणी शेख कमरोद्दीन, माजी ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष अन्सार शेख, पत्रकार अली रजा खान, शरीफ बागवान सर, बबलु शेख,शिक्षक सेना अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख जावेद रहीम उपस्थित होते.