भडगाव येथे जागृती मंडळ व जागृती वाचनालया तर्फे आयोजित पुस्तक वितरण आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भडगाव येथील २५० विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून भडगाव येथील २५० विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

भडगाव येथे जागृती मंडळ व जागृती वाचनालयातर्फे आयोजित पुस्तक वितरण व वकृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील हे होते .बक्षीस वितरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नानासाहेब प्रताप हरी पाटील व डॉ.नितीन सोनवणे हे होते .
भडगाव येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या 250 विद्यार्थ्यांना प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित स्पर्धा परीक्षांची सर्वंकष माहिती असणारे”स्पर्धा परीक्षा सारथी”पुस्तके आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून भेट देण्यात आली .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर आप्पा पाटील यांनी परिसरातील मुलांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यशाचे शिखर गाठावे व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजाची प्रामाणिकपणे सेवा करावी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या . प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार करिअर निवडावे ,प्रामाणिक अधिकारी म्हणून देशाची सेवा करावी .आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाच्या माध्यमातून देशाची सेवा करून आपल्या क्षमतांचा वापर करावा. पालकांनी मुलांना करिअर निवडताना त्यांची आवड व क्षमता लक्षात घेऊन करियर निवडून द्यावे अशा प्रकारचे प्रतिपादन प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दीपक मराठे यांनी केले .आभार प्रदर्शन योगेश शिंपी यांनी केले .पुस्तक वितरण नियोजन गजुभाऊ पाटील यांनी केले.