जिजाऊ ब्रिगेडतर्फे सावित्रीबाई जन्मोत्सव साजरा

जिजाऊ ब्रिगेडतर्फे सावित्रीबाई जन्मोत्सव साजरा

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस. एस. एम. एम. महाविद्यालय पाचोरा येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती जिजाऊ ब्रिगेडतर्फे उत्साहाने साजरी करण्यात आली

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते शिवव्याख्याते प्रा.डाॅ.माणिक पाटील यांनी विद्यार्थीनीना सावित्रीमाईंच्या कार्याची माहिती सांगितली व तुम्हीही सावित्रीबाईचा आदर्श घेतला पाहिजे व शिक्षित होऊन एक उन्नत समाज निर्मिती केली पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक प्रा डॉ. सुनीता गुंजाळ यांनी प्रस्ताविकातून जिजाऊ ब्रिगेडची भुमिका मांडली जिजाऊ ब्रिगेड विधायक काम करण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे सूत्रसंचालन प्रा श्रीमती मनीषा चव्हाण व आभार प्रदर्शन प्रा श्रीमती मनीषा पाटील यांनी केले.कार्यक्रमात सिद्धि कुलकर्णी,राजेश्वरी पाटील, समिक्षा सोनवणे, खाटीक तंजिला,सोनाली पाटील श्रुती शिंपी, भाग्यश्री जिरी,रुपाली तडवी, या विद्यार्थीनीनी उत्स्फुर्तपणे भाषणे केली
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरिष पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा जी. बी. पाटील व पर्यवेक्षक प्रा एस. एम. पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा डॉ. श्रीमती सुनीता गुंजाळ, श्रीमती सुनिता सोहत्रे, श्रीमती मनीषा माळी, श्रीमती विजया देसले, श्रीमती छाया पाटील, श्रीमती सुजाता पवार व श्रीमती नूतन पाटील या सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या सर्व प्राध्यापिकांचे विशेष असे सहकार्य लाभले, त्याचबरोबर कार्यक्रमास प्राध्यापक बंधू प्रा एस एस पाटील प्रा डॉ बडगुजर प्रा.नितिन पाटील,प्रा.देसले प्रा ठाकरे प्रा. गौरव चौधरी व इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थिती व सहकार्य लाभले.