ऐतिहासिक माहिजी देवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

ऐतिहासिक माहिजी देवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

पाचोरा (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावट असल्याकारणाने माहिती येतील यात्रोत्सव पूर्णतः बंद होता त्यामुळे यावर्षी भाविक भक्तांची नवस फेडण्यापासून तर मायच दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी येत असल्याने या ठिकाणी भाविक भक्त व इतर व्यवसायिक यांची रेलचेल नांद्रा वरून जाताना लगबग बगा वयाला मिळत आहे येथून जवळच असलेल्या माहिती येतील तीनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक माहिजी देवी यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 6 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे सालाबादप्रमाणे यावर्षीही नवस, जाऊळ, निमसाळा देवीला नवसाला पावण झाल्यामुळे नवस फेडण्याची प्रथा आजही भाविक वर्गातून सुरू आहे या ऐतिहासिक माहीजी देवीची पादुकां पालखी सोहळा भव्य मिरवणूक दिनांक 6जानेवारी रोजी सकाळी 5.वाजता पूजन माजी खासदार ए.टी नाना पाटील यांच्या सपत्नीक शुभ हस्ते पूजन व होणार आहे, गिरणा तीरावर असलेले या मंदिराला एरंडोल तालुक्याला जोडण्याचे काम आतापर्यंत एका होडीने सुरु आहे परंतु आता त्या ठिकाणी भव्य असा पूलही मंजूर झाला असून त्यामुळे धुळे जळगाव जिल्ह्याचा अंतर कमी होणार आहे म्हणून या दोन तालुक्यांना जोडण्याचा काम करणाऱ्या या गिरणा नदीवर या ऐतिहासिक मायजी देवीच्या पर्यटन तीर्थक्षेत्र मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत होऊन तत्कालीन माजी खासदार एटी नाना पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे साडेतीन कोटीचे भव्य असे सभामंडप मंदिराच्या कळसाला व पूर्ण पटांगणावर साकार होत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त नवसाला पावण होणारे देवी म्हणून या ठिकाणी नवस मानून व फेडण्यासाठी येत असतात या ठिकाणी उद्योग व्यवसायात, गृहशांती, प्रपंच व कौटुंबिक सुख,लावावे म्हणून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात व नवस फेडतात यात्रेला ऐतिहासिक महत्व असून शेकडो वर्षांपूर्वी ही यात्रा बारा महिने चालत होती या गावाला अगोदर चिंचखेडा असे संबोधले जायचे परंतु तत्कालीन वेळी देवीचा साक्षात्कार झाला व देवी माय प्रकटली म्हणून मायजी हे नाव पडले तिची आख्यायिका अशी आहे की महिजी देवी व त्यांची लहान बहीण गावात येत असताना लहान मुलांनी बघितले व तिला वेडसर म्हणून देवीला त्यांनी हि नवले यामुळे माहिजी देवीने तिच्या तीक्ष्ण नजरेने त्या मुलांकडे बघितले त्याच वेळेस ते मुलं मुरचीत येऊन पडले ही बातमी गावातील लोकांना कळल्यानंतर भाविकांनी देवीला विनंती केले तेव्हा देवीने पुन्हा त्यांना शुद्धीवर आणले व काही पावलावरच त्या जाता जाता दोघ बहिणी अदृश्य झाल्या,कालांतराने त्या ठिकाणी त्या जागेवरच त्रिशूल व बाण निघाले त्यावरून माय प्रकटली असे लोकांची समज व श्रद्धा झाल्यामुळे तेथे लोकांनी जीर्णोद्धार करून देवीचे मंदिर साकार केले यानंतर मायचे गाव म्हणजे मायजी असे या गावाला संबोधण्यात येऊ लागले कालांतराने अपभ्रंश होऊन मायजी चे माहिजी असे नाव झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे व त्याच देवीच्या नावावरून इंग्रज राजवटी पासून नांद्रावरून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर व कुरंगी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनला,चार किलोमीटर अंतर असणाऱ्या माहिजी या गावाचे नाव देण्यात आले गेल्या दहा वर्षापासून माही जी येतील गावातील भक्तगण यांनी सुरू केलेल्या माहीजी देवीच्या पादुका, पालखीची मिरवणूक व पूजन सकाळी पाच वाजल्यापासून संवाद,टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक निघते यादरम्यान संपूर्ण गावात दारांवर सडा,रांगोळी, घरांवर गुढी उभारून गावासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते सालाबादप्रमाणे व नित्य नियमानुसार माजी खासदार एटी नाना पाटील हे सपत्नीक यावर्षीही पालखी सोहळ्यास पूजनासाठी उपस्थित राहणार आहेत पालखीचे पूजन या ठिकाणी पूजाअर्चा सेवा मानकरी म्हणून भगत कुटुंबातील यावर्षी रवींद्र रामराव भगत हे सेवा करणार आहेत याप्रसंगी मनोरंजन म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कलाकार यांच्या लोकनाट्य तमाशा ची या सात दिवसात हजेरी असते दिवसभर मंदिर परिसरात होम, हवन, सत्संग,भजन, व रात्री कीर्तनाचे कार्यक्रम असतात या यात्रेला भाविकांची विशेष सोय ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येते यात्रादरम्यान चोरी चपाटी,मुली व महिलांची कुठल्याच प्रकारची अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौक बंदोबस्तासाठी छावणी टाकून पाचोरा तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाने बीट हवालदार, पोलीस विभागातर्फे प्रशासन चौक बंदोबस्त करत असतात.