श्री. गो.से. हायस्कूल. पाचोरा येथील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

श्री. गो.से. हायस्कूल. पाचोरा. येथील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री गो.से . हायस्कूल पाचोरा शाळेतील सहावी क चा विद्यार्थी आर्यकुमार शेवाळकर याने जळगाव येथे झालेल्या 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सलग पाच विजय संपादन करून नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ. संस्थेचे चेअरमन संजय वाघ. मानस सचिव महेश देशमुख. वाईस चेअरमन विलास जोशी. शालेय समिती चेअरमन खलील देशमुख. तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ . उपमुख्याध्यापक एन .आर .ठाकरे . पर्यवेक्षक आर एल. पाटील. व ए.बी.अहिरे यांनी अभिनंदन केले व नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक संदीप मनोरे यांचे अनमोल सहकार्य लाभले