निमगाव वाघा शिवारात धनगर समाजातील मेंढपाळ महिलेवर जोरदार हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळण्याची धनगर समाजाची मागणी

निमगाव वाघा शिवारात धनगर समाजातील मेंढपाळ महिलेवर जोरदार हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळण्याची धनगर समाजाची मागणी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील अनेक गावातील गावगुंडाकडून धनगर समाजातील मेंढपाळावर नेहमीच हल्ले होत आहेत.शासनाने मेंढपाळांना ॲट्रोसीटी कायद्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम मेंढपाळ बांधवांकडून होत आहे.असाच एका गावात गावगुंडाकडून मेंढपाळ महिलेवर हल्ला करण्यात आला आहे.ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील निमगाव वाघा शिवारात घडली. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील एक “टकले” परीवारातील पाच व्यक्तींचे कुटुंब हे एक गाय आणि १७० मेंढ्या घेऊन नगर तालुक्यातील चास गावातील अडसूळ काॅलेजच्या मोकळ्या जागेत राहुटी करून रहात होते.दिनांक ३१ऑगष्ट २०२५ रोजी सदर कुटुंबातील आई आणि मुलगा हे आपली मेंढरं घेऊन निमगाव वाघा शिवारात चारण्यासाठी गेले होते.दिवसभर मेंढ्या चारून झाल्यावर सदर मेंढ्यांच्या कळप हा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या चास गावातील अडसूळ काॅलेजच्या मोकळ्या जागेत राहुटी करून रहात असलेल्या जागेकडे चालला असता त्याचवेळी त्याच गावातील दिपक सबाजी कापसे,राहणार, निमगाव वाघा, तालुका,जिल्हा अहिल्यानगर यांनी काही एक कारण नसताना सदर मेंढ्यांचा कळप आडवून मेंढपाळ महिलेला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.तसेच सदर मेंढपाळ महीलेच्या तोंडावर,हातावर, पाठीवर रक्त बंबाळ होईपर्यंत काठीने वार करत झोडपून काढले आणि दुखापत केली.तसेच तुम्ही येथे मेंढ्या चारावयास आणायच्या नाहीत.जर तुम्ही ईकडे मेंढ्या चारावयास आलात तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकील अशी धमकीही दिली.नंतर सदर महीलेने चास येथील डॉक्टर सोनवणे यांच्या दवाखान्यात जाऊन प्रथमोपचार घेतले.या बाबद सदर अंन्यायग्रस्त मेंढपाळ महिलेतर्फे अहिल्या नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये जाउन गुन्हा रजिस्टर नंबर ७२५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५,११८(१), ३५१(२), ३५१(३),३५२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मेंढपाळ महीलेच्या कुटुंबात पती, दोन मुले,एक सून असा परीवार या तांड्यावर रहात आहे.सदर कुटुंबाचा मेंढपाळाचा व्यवसाय असून मेंढ्या चारण्यासाठी ते मजल दर मजल करत अनेक गावांत भटकंती करीत असतात. सदर घटनेची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते आणि यशवंत सेनेचे अहिल्यानगर शहर अध्यक्ष कांतीलाल जाडकर साहेब यांनी थेट सदर कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष सहकार्य केले.अहिल्या नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके साहेब आणि पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी धनगर समाजातील बांधवातर्फे करण्यात आली आहे.सदर अन्यायग्रस्त मेंढपाळ महिला ही पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावातील कायम रहीवाशी आहे.मेंढ्या चारण्यासाठी टकले कुटुंब हे चास गावात दाखल झाले होते. सरकारने मेंढपाळावर नेहमीच होणाऱ्या हल्ल्या बाबद कडक कायदा करण्याची मागणी होत आहे.धनगर समाजाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर आणि विधान परीषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून मेंढपाळ बांधवावर नेहमी होणाऱ्या हल्ल्या बाबद नवीन कायदा करण्या साठी राज्याच्या दोन्ही सभागृहात लक्षवेधी सूचना मांडून कायदा पारित करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.