क्रिएटिव्ह स्कूल ला रक्षाबंधन व महिला मेळावा उत्साहात संपन्न

क्रिएटिव्ह स्कूल ला रक्षाबंधन व महिला मेळावा उत्साहात संपन्न

नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त दिनांक 10 ऑगस्ट रोजी परिसरातील महिला पालक व माता-भगिनी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत महिला मेळावा व रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न झाला या याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष व उद्घाटक म्हणून सरपंच ताई आशाताई भिकन तावडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कुरंगी, महिजी, वरसाडे, आसनखेडे,लासगांव,बांबरुड, सामनेर नांद्रा, पहाण,हडसन येथील महिला पालक प्रतिनिधी या होत्या सुरुवातीला भारत माता, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आलेल्या महिला भगिनी यांनी आपापल्या मनोगता तून स्त्री शक्ती चा जागर, आजची शिक्षण व्यवस्था व ग्रामीण भागातील दर्जेदार इंग्रजी शिक्षण काळाची गरज!,या विषयांवर आपल्या मनोगतुन डोळे पाणावतील अशा प्रकारे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली पाटील व शिक्षिका अरुंधती राजेंद्र यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नम्रता पवार, पुनम सोनवणे,श्वेता बोरसे,जयश्री पाटील,श्वेता पाटील वैशाली पाटील,अरुंधती राजेंद्र,पूजा धोबी,सुभाष पिंपळे,नामदेव पाटील, नवल पाटील यांनी परिश्रम घेतले