श्री .गो.से.हायस्कूल पाचोरा . येथे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा चे आयोजन

श्री .गो.से.हायस्कूल पाचोरा . येथे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा चे आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी) श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे केंद्र क्रमांक 33 10 असून परीक्षेसाठी 451 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या परीक्षेचा वेळ असून त्याची बैठक व्यवस्था शाळेच्या इमारतीत करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील सहभागी विद्यार्थी यांनी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहून परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रप्रमुख मुख्याध्यापिका प्रमिला वाघ. उपकेंद्र संचालक आर. एल .पाटील. यांनी केले आहे