बदली प्रक्रियेस विलंब करणाऱ्या प्रशासना विरोधात लढा अजून तीव्र करणार कॉ.विरेंद्रसिंग पाटील

बदली प्रक्रियेस जाणून विलंब करणाऱ्या प्रशासना विरोधात लढा अजून तीव्र करणार…कॉ.विरेंद्रसिंग पाटील
विद्युत भवन जळगाव समोर भव्य द्वार सभा संपन्न

दि.९ मे २०२३ ला महावितरण कंपनीच्या प्रलंबित विनंती बदल्या तात्काळ कराव्या या मागणी करीता महाराष्ट्रभर द्वारसभा घेऊन निदर्शने जळगाव परिमंडल कार्यालय विद्युत भवन अजिंठा रोड समोर दुपारी 01:30 वाजता भव्य द्वार सभा व निदर्शने
**************************************
महावितरण कंपनीतील कर्मचारी,अभियंते,अधिकारी गेल्या ३ वर्षापासून गंभीर आजार,पती-पत्नी एकत्रीकरण, अपंग,सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे,सेवानिवृत्ती दोन वर्ष शिल्लक आहेत,मूळ रहिवाशी ठिकाणापासून ८०० ते १००० किलोमीटर अंतरावर कार्यरत असलेल्या अशा विविध कारणे विनंती बदल्या मागत आहेत. विनंती बदल्याचे धोरण ठरविण्यास महावितरण कंपनीच्या प्रशासनाचे नियोजन व वेळच नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर बैठक घेण्यास सुद्धा महावितरण कंपनी प्रशासनास वेळ मिळत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पदोन्नती वेळोवेळी आणि सोयीनुसार केल्या जातात. महावितरण कंपनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात प्रचंड चीड बदली करीता इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये व्याप्त आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरीता महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना आंदोलनाची नोटीस *महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेने दिलेली होती*.
महावितरण कंपनीचे कामगार, कर्मचारी, अभियंते,अधिकारी अतिशय कठीण परिश्रम करून विक्रमी महसूल गोळा करत आहे.करोडो रुपयांच्या वीज चोऱ्या उघड करून कंपनीच्या महसुला मध्ये वाढ करत आहे.कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा,फरक रजा रोखीकरणाचे पैसे व इतर आर्थिक देणे मागण्याकरीता आंदोलन करावे लागते.हे हक्काचे पैसे देताना प्रशासन जसं काही कर्मचाऱ्यांवर उपकार करत आहे अशा अविर्भावात वावरत आहे. प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्याकरीता बदली इच्छुक कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांनी *९ मे २०२३ (मंगळवारी) सर्व महाराष्ट्रभर द्वारसभा घेऊन निदर्शने करण्याचे आवाहन संघटनेने केलेले होते* त्यानुसार *विद्युत भवन समोर, अजिंठा रोड ,जळगाव दुपारी 1:30 वाजता द्वार सभा घेऊन भव्य निदर्शने करून शासन व प्रशासन च्या विरोधात असंतोष प्रकट करण्यात आला* संघटनेचे परिमंडळ सचिव तथा राज्य संयुक्त सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांनी प्रशासनाच्या वेळ काढू व निष्काळजीपणा च्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला.जर या द्वार सभा च्या नंतर ही प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही तर या पूढे हा लढा तीव्र करून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.सदर द्वार सभे मध्ये कॉ.देविदास सपकाळे प्रसिद्धी प्रमुख, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,कॉ.दिनेश बडगुजर सर्कल सेक्रेटरी,कॉ.संध्या पाटील केंद्रीय महिला आघाडीच्या सदस्या, यांनी निषेध व्यक्त केला श्रीमती विजया कोळी,श्रीमती सुषमा पाटील,कॉ.प्रभाकर महाजन, कॉ.किशोर जगताप,कॉ.मुकेश बारी,कॉ.अनिल धोबी,कॉ.गिरीष बर्हाटे, कॉ.सचिन फड,कॉ.नागेश पारधी, कॉ.मनोज जिचकार,कॉ.दीपक बडगुजर,कॉ.हेमंत बारी,कॉ.शरद बारी, अशोक सुरवाडे पाचोरा संदीप तायडे ,कॉ.सागर पाथरवट, कॉ.निखिल पटले,कॉ.भगवान बारी, कॉ.किशोर सपकाळे,कॉ.अमोल वाडीभस्मे,कॉ.गणेश सातपुते,कॉ.सुभाष भालेराव,कॉ.किरण चव्हाण पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कॉ.मुकेश बारी यांनी सुत्रसंचलन केले.