जोपर्यंत धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही : दिपकभाऊ बोर्हाडे 
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
१६ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.आणि त्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार मावळे उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत धनगर समाज एसटी आरक्षण अंमल बजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही अशी भूमिका धनगर समाजाचे नेते संघर्ष योद्धे दिपकभाऊ बोर्हाडे यांनी घेतली आहे.ते जालना,अंबड, पाचोड,पैठण, शेवगाव,वृद्धेश्वर कारखाना, तिसगाव, करंजी, अहिल्यानगर, शिरूर,चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल,मार्गे मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत असताना वाटेत वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथे थांबले होते.त्यावेळी शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या वतीने त्यांचे पत्रकार सुनिल नजन,आंबेडकरी चळवळीतील युवा नेते अमोल जाधव,राजू मामा तागड,विष्णू सोलाट,विनायक नजन सर, राजेंद्र मतकर सर, ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर, नवनाथ मतकर, मारूती घुले, विष्णू उघडे, सुदाम खरात,मळेश्वर बडे,वाघोली सोसायटीचे चेरमन पांडुरंग दातिर यांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.त्या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. बोर्हाडे साहेब पुढे म्हणाले की धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढा कित्येक वर्षांपासून लढला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांनी बारामती आणि सोलापूर येथे धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा जो शब्द दिला होता तो पाळला पाहिजे.आमच्या घटना दत्त अधिकाराची अंमल बजावणी करून आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करावा या शिवाय दुसरा पर्याय आमच्या समोर दिसत नाही.उद्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातील मल्हार मावळे मुंबईत दाखल झाल्या नंतर जो पर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा कडक इशारा दिपक बोर्हाडे यांनी सरकारला दिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी दोन दिवसांपूर्वी जी चर्चा झाली त्यावेळी ही आम्ही आमची भूमिका स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलेली आहे असे बोर्हाडे साहेब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.धनगर समाज एसटी आरक्षण लढा मुंबईत पेटला की त्याचा वनवा संपूर्ण राज्यभर उसळणार आहे.त्या अगोदरच सरकारने या मुद्यावर तोडगा काढला पाहिजे अशी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज जमातीची मागणी आहे.”ना नेता ना पक्ष, धनगर समाज एसटी आरक्षण लढा हेच लक्ष” अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे.सरकार या प्रकरणी नेमका काय तोडगा काढतय या कडे देशातील सर्व धनगरांचे लक्ष लागले आहे.






















