शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे व नेताजी बोस यांना अभिवादन

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे व नेताजी बोस यांना अभिवादन

पाचोरा, दिनांक २३ (प्रतिनिधी ) : येथील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते दोन्ही मान्यवरांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आगामी काळात वाटचाल करण्याचा निर्धार याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. तर जोरदार जयघोष करत अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा, एडवोकेट दीपक पाटील शहर प्रमुख पाचोरा, ज्येष्ठ शिवसैनिक राजीव काळे, पप्पू राजपूत, हरिभाऊ पाटील, सय्यद अब्दुल गफ्फार, द्वारकाबाई, संजय चौधरी, नामदेव चौधरी, पप्पू जाधव, संदीप जैन उपजिल्हा युवा अधिकारी, मनोज चौधरी शहर युवा अधिकारी पाचोरा, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, गौरव पाटील, नाना वाघ, संतोष पाटील, जे डी गांगुर्डे, शुभम राजपूत, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.