श्री.गो से हायस्कूल देतेय अडीच हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

श्री.गो से हायस्कूल देतेय अडीच हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

पाचोरा शहरातील सर्वात जुने आणि तालुक्यातील मातृशाळा म्हणून ओळख असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलने पाचवी ते दहावीच्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडत झूम व गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. रोज ठराविक वेळेचे नियोजन केले जात असून विद्यार्थ्यांना त्यावेळेस ऑनलाईन शिक्षण दिले जात असून वेळापत्रक देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिले गेले आहे.विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग या ऑनलाईन मीटिंगमध्ये होत असल्याबद्दल मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
प्रत्यक्ष शाळा आणि शिक्षणाची ओढ मात्र कायम
जरी शाळांमधून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचू शकत नाही, नेटवर्क आणि मोबाइल त्यांच्या समस्या आहेत हे जरी सत्य असले तरी आज दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे आणि ऑनलाईन शिक्षण मिळूनसुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची ओढ मात्र कायम आहे आणि ज्या दिवशी शाळा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुरू होतील त्यादिवशी तितकाच उत्साह विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये असेल हेदेखील तेवढेच खरे! या उपक्रमात सर्व शिक्षक उत्साहाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात इयत्ता दहावी वर्गासाठी विज्ञान प्रात्यक्षिक पीडीएफ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळत आहे तसेच चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या सर ऑनलाईन स्पर्धा यातसुद्धा श्री गो से हायस्कूल पाचोरा या शाळेने बाजी मारली आहे राज्यपातळीवर जिल्हा पातळीवर तालुकास्तरावर ऑनलाइनच्या माध्यमातून शाळेला वरिष्ठांकडून नेहमी कौतुकाची थाप मिळते यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ सचिव भैय्यासाहेब देशमुख व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी सर्व संचालक मंडळ शालेय समिती चेअरमन खलील देशमुख तांत्रिक विभाग प्रमुख नगरसेवक वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील सर उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर ठाकरे, ए बी अहिरे यांचे नेहमी मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणामध्ये शाळेमध्ये व शिक्षकांमध्ये असे वातावरण आहे