भव्य राज्यस्तरीय महिला सप्ताहाचे आयोजन

भव्य राज्यस्तरीय महिला सप्ताहाचे आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील थोर साधुसंतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि महिलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी व सर्वांना आध्यात्मिक गोडी लागावी म्हणून पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे अध्यक्ष ह भ प सुनीताताई पाटील व भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर यांनी आपल्या पाचोरा शहरामध्ये दिनांक 22 ते दिनांक 29 नोव्हेंबर दरम्यान वारकरी भवन रामदेव लॉन्स च्या मागे जारगाव चौफुली पाचोरा येथे रात्री ते ८:३० ते १०:३० भव्य राज्यस्तरीय महिला किर्तन सप्ताह चे आयोजन केले आहे सदर कीर्तना सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महिला उपस्थित राहणार आहेत
त्या त प्रामुख्याने महाराष्ट्रातील नामवंत समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या धर्मपत्नी सौ शालिनीताई देशमुख इंदुरीकर यांचे सुद्धा कीर्तन होणार आहे
सप्ताहामध्ये प्रथम पूजाताई महाराज पाढलसे सौ निता ताई गिरी महाराज पैठण भागवताचार्य शिवानी ताई गवळी ताराहाबाद समाज प्रबोधनकार सौ शालिनीताई देशमुख इंदुरीकर संजीवनी ताई गडाख मनमाड ह भ प सौ सुनीता ताई पाटील पाचोरा सुवर्णाताई जमदाडे येवला आणि सविता ताई केकान आळंदी यांचे कीर्तन होणार आहेत
तसेच पखवाज वाजवण्यासाठी अश्विनीताई मतसागर पिंपळस आणि गायनासाठी रूपालीताई गायधनी नाशिक आणि सविताताई केकान आळंदी हे असणार आहे त
तसेच सप्ताहामध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि लक्ष्मी माता यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठान देखील होणार आहे दिनांक 24 रोजी गावातून भव्य मिरवणूक होणार असून दिनांक 26 रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे
तरी या सप्ताहामध्ये सर्व तालुक्यातील 22 भक्तांनी हजेरी लावावी लहान संस्थेच्या अध्यक्षा शैक्षणिता ताई पाटील व भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर यांनी केले आहे