गोपीचंद पुना पाटील,विद्यालयाच्या नंदिनी,पायल व कृष्णा यांची नाशिक विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड…!!!!!!
भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील कु.नंदिनी लक्ष्मण सुर्यवंशी (वयोगट १७-४८ किलो),कु.पायल गोविंदा सुर्यवंशी (वयोगट १७-६० किलो) तसेच चि.कृष्णा सुनिल पाटील (वयोगट १९-५० किलो) यांनी क्रीडा व युवकसेवा संचलनालय,पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छ.शि.महाराज,क्रीडा संकुल,जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत प्रथमस्थान प्राप्त केले असून त्यांची नाशिक येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे,तसेच याच स्पर्धेत चि.भावेश जितेंद्र पाटील (वयोगट १४-५० किलो) तथा कु.पुजा भक्तराज महाजन (वयोगट १७-४४ किलो) यांनी उपविजेतेपद प्राप्त करीत यश संपादन केले आहे.
यशस्वीतांना कार्यवाहक रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,सुनिल पैलवान,गोविंदा सुर्यवंशी,लक्ष्मण सुर्यवंशी,जितेंद्र पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा.राजेश जाधव,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.