पाचोरा नगरपालिकेच्या डॅशिंग महिला मुख्याधिकारी यांना प्रमोशन मिळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष करून केले जंगी स्वागत

पाचोरा नगरपालिकेच्या डॅशिंग महिला मुख्याधिकारी यांना प्रमोशन मिळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष करून केले जंगी स्वागत

पाचोरा:
येथील नगरपरिषदच्या मुख्याधिकारी श्रीमती.शोभा बाविस्कर यांना मुख्याधिकारी गट अ या पदावर पदोन्नती झाल्याचे दिनांक 18/04/2022 रोजी सायंकाळी नगरविकास विभागाचे आदेश प्राप्त होता. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 19/04/2022 रोजी सकाळी मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर कर्मचा-यांतर्फे त्यांचे अभुतपुर्व असा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्यांची ढोल ताश्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी कर्मचा-यांचा उत्साह पाहण्यासारखा होता नगरपरिषद कार्यालयास प्रवेश करतांना फटाक्यांच्या आतिषबाजींने त्यांचे जल्लेाषात स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रवेश मार्गावर फुलांचा सडा घालण्यात आला होता त्याच प्रमाणे त्यांच्या दालनाची अतिशय सुंदर अशी सजावट कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेली होती.
अनपेक्षीत पणे झालेल्या या स्वागत सत्काराच्या कार्यक्रमामुळे मुख्याधिकारी या अत्यंत भारावून गेल्यात व माझेवर कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आपुलकी बद्दल सर्वांचे आभार मानतांना त्यांच्या डोळयात आलेले पाणी लपून राहीले नाही. मुख्याधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना संबोधीत करतांना सांगीतले की, या पुढे देखील असेच प्रेम व सहकार्य मला मिळेल अशी अपेक्षा करीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगररचनाकार मानसी भदाणे, भांडारपाल प्रगती खडसे, रोखपाल सुधिर पाटील, व.लिपीक रमेश भोसले, सभा लिपीक राजेंद्र शिंपी, लिपीक ललित सोनार, विलास देवकर, प्रकाश पवार, संदिप भोसले, किशोर मराठे, प्रकाश गोसावी, रोहीत अहिरे, आकाश खैरनार, संदिप जगताप, नाना धनगर, गोपाल लोहार, भिकन गायकवाड, विशाल मराठे, भागवत पाटील,महेंद्र गायकवाड, रफिक बेग, फिरोज पठाण, सुभाष चौधरी, उध्दव महाजन, अनिल वाघ, युवराज जगताप, विजेंद्र निकम, मनोज पाटील, गणेश अहिरे, कल्पना पवार, यमुना ब्राम्हणे, कल्पना वैद्य, सुरेखा पाटील, रुमा खेडकर, सचिन बागूल, नितीन गायकवाड, सुरेश पाटील, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.